ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहन धारिया यांचं निधन

ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक आणि माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचं आज पूना हॉस्पीटलमध्ये निधन झालं. ते 89 वर्षांचे होते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 14, 2013, 10:46 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचं आज पूना हॉस्पीटलमध्ये निधन झालं. ते 89 वर्षांचे होते.
धारिया यांना किडनीच्या विकारामुळे शनिवारी पूना हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं...तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.. धारिया यांचा जन्म महाड तालुक्यातील नेटे गावात झाला होता. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी शिक्षण सोडून स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. ते वनराई या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी कार्य करीत होते.
त्यांच्या निधनाने सर्वच स्तरांतून शोक व्यक्त केला जातोय.. आज दुपारी दोन वाजता त्यांचं पार्थिव घरी नेण्यात येणार आहे.. दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत पार्थीव घरी अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येईल.. त्यानंतर संध्याकाळी तीन ते पाच वाजेपर्यंत पार्थीव अंत्यदर्शनासाठी वनराईच्या कार्यालयात ठेवण्यात येईल. सायंकाळी पाच वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.