महिलेशी गैरवर्तन हात-पाय तोडा, महाराजांचे `ते पत्र` सापडले

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।

Updated: Dec 13, 2012, 06:23 PM IST

www.24taas.com, पुणे

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
समर्थ रामदासांचे हे श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांसाठीच तयार झाले असे वाटते. ह्या शब्दांचा साज हा महाराजांच्या किर्तीचं वर्णन करण्यासाठीच रचिला होता. पर-स्त्री मातेसमान असं म्हणणारे महाराज फक्त बोलण्यातूनच नव्हे तर त्यांच्या वागण्यातूनही ते दाखवून देत असे.
खेड गावचा मुकादम भिकाजी गूजर यांना शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिलं होतं. रांजेगावच्या पाटलानं महिलेशी गैरवर्तन केल्यानं त्याला त्याच्या या अपराधाची ही शिक्षा मिळायलाच पाहिजे. आणि त्यासाठीच महाराजांनी पाटलाचा उजव्या हात आणि डावा पाय कलम करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राजेंगावच्या पाटलाचा चौरंगा (हात-पाय कलम) करण्यात आला. महाराजांचा हा न्याय आता पुराव्यानुसार सिद्ध झाला आहे. शिवाजी महारांजांनी त्याचे हात पाय तोडले, हा प्रसंग या त्यांनी पत्रात नमूद केला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचं एक दुर्मिळ पत्रं भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दफ्तरात तब्बल ८२ वर्षांनी सापडले आहे. हे पत्र शिवाजी महाराजांचे खरे पत्र असून यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपण पाहू शकतो. शिवाजी महाराजाचं हे पत्र १९२९मध्ये मंडळातल्या स. गं. जोशी यांना मिळालं होतं. त्यानंतर मंडळानं या पत्रातला मजकूर १९३० मध्ये शिवचरीत्र - साहित्य खंड २ मध्ये प्रकाशित केला.

त्यानंतर मात्र १९३० मध्ये हे पत्र गहाळ झालं होतं. आता तब्बल ८२ वर्षांनंतर हे पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दफ्तरातच सापडल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचं खरं पत्र अत्यंत जीर्ण झाले आहे. मात्र जीर्ण झाले असतानाही या पत्रातील पंचात्तहर टक्के मजकूर हा सध्याच्या परिस्थितीतही वाचता येतो.
शाई जास्त लागल्यामुळे शिक्कामोर्तबाचे वाचन करता येत नाही. मात्र मोजमापा वरून ते शिवाजी महाराजाचे शिक्कामोर्तब आहेत हे सिध्द होते. हे पत्र शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी अर्थात १६६४ मध्ये लिहिलेला आहे.