www.24taas.com, झी मीडीया, पुणे
पुण्याच्या सिंहगड स्प्रिंगडेल शाळेत आज संतप्त पालकांनी तोडफोड केलीय. स्कूल बलच्या अटेंडन्टकडून मिनी केजीमध्ये शिकणा-या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. तसेच संस्थाचालक मारूती नवले यांनाही धक्काबुक्की झालीय.
संबंधित मुलगी शुक्रवारी शाळेत आली असताना ज्या बसनं ती शाळेत येते त्या बसमधल्या अटेंडन्टनं शाळेच्या आवारातच तिच्यासोबत गैरप्रकार केला. तिच्या मुलीनं पालकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेला यासंदर्भात माहिती दिली.
मात्र असं असताना संबंधित अटेंडेन्टवर कारवाई होण्याऐवजी तो आज कामावरच असल्याचं दिसून आला. त्यामुळे पालक आज सकाळपासून शाळेसमोर जमले होते.
या ठिकाणी तब्बल तीन तास थांबल्यानंतर संस्थाचालक मारुती नवले शाळेबाहेर आले आणि त्यांनी पालकांना कारवाईचं आश्वासन देण्याचा प्रयत्न केला, मात्र आश्वासन नको कृती पाहिजे अशी मागणी पालकांनी यावेळी केली. त्याचवेळी काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि गोंधळाला सुरुवात झाली.
तसंच संस्थाचालक मारुती नवले यांना धक्काबुक्की देखील केली. दरम्यान संबंधित बसच्या अटेंडन्ट आणि ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलंय. तसंच शाळेच्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शाळेतर्फे देण्यात आलीय.
पुण्यातल्या एरंडवणेमधल्या संस्थेच्या शाळेत हा प्रकार घडलाय. या बसमध्ये महिला अटेंडन्ट नव्हती. त्यामुळे विद्यार्थी वाहतुकीशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषयही यानिमित्तानं पुढे आलेत.
व्हिडीओ पाहा शाळेतील संतप्त पालक आणि तोडफोड
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.