www.24taas.com, सोलापूर
सोलापुरातल्या माढा जळीत कांडाप्रकरणी पाच जणांना फाशी सुनावण्यात आली आहे. तर दोघांची निर्दोष मुक्तता झालीए. फाशी झालेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
सोलापुरातल्या माढा तालुक्यातल्या बेंदवस्ती या पारधी वस्तीवर 16 जानेवारी 2008 ला आपआपसांतील वादातून मध्यरात्री झोपडी पेटवून देण्यात आली होती. त्यात सहा लहान मुलं आणि दोन महिला जळून खाक झाल्या होत्या. या जळीत कांडामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला होता.
या घटनेनंतर शरद पवार तसंच आर.आर.पाटलांनी घटनास्थळाला भेट दिली होती आणि आरोपीला कठोर शासन सरकार करेल असं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणं पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला. या तपासात अभिमान काळे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्याप्रमाणं कोर्टानं प्रमुख आरोपी झुंबरबाई काळे यांच्या दहा साथीदारांना दोषी ठरवलं. त्याप्रकरणी आज शिक्षा सुनावण्यात आली.