www.24taas.com, सोलापूर
दुष्काळग्रस्त गावांसाठी सोडलेल्या उजनी धरणाच्या पाण्यावर सहकारमंत्र्यांच्याच साखर कारखान्यानं डल्ला मारल्याचं समोर आलंय.
सोलापूर शहर आणि आसापासच्या ४० गावांसाठी एक टीएमसी पाणी सोडण्यात आलं होतं. मात्र, हर्षवर्धन पाटील यांच्या इंद्रेश्वर साखर कारखान्यानं धरणाच्या पाण्याची चोरी केल्याचं उघड झालंय. एकीकडं दुष्काळग्रस्तांच्या वाटेचं पाणी इंद्रेश्वर कारखान्यानं पळवलं असताना दुसरीकडे वीजेबाबतही दुजाभाव समोर येतोय. नदिकाठच्या गावांचा वीजपुरवठा खंडीत केला असताना इंद्रेश्वर कारखान्याचा वीजपुरवठा मात्र सुरुच आहे.
सत्ताधाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांची क्रूर थट्टा केल्याचं समोर येतंय. एकीकडे दुष्काळग्रस्त गावांना मदतीची आश्वासनं द्यायची आणि दुसरीकडे त्यांच्याच वाट्याला आलेली मदत दुसरीकडे वळवायची या सत्ताधाऱ्यांच्या कृतीनं दुष्काळग्रस्त गावांमधून संताप व्यक्त होतोय.