www.24taas.com, पुणे
मुंबईत हल्ला करून १६२ निरपराध जीवांचे बळी घेणार क्रुरकर्मा कसाब समोर मृत्यूला पाहून भेदरला होता. फाशीच्या वेळी तो अस्वस्थ आणि गप्प होता, असे जेल प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.
कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आज त्याला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली. यावेळी निर्विकार दिसणारा कसाब हा आतून खूप भेदरला होता. त्याने निघृणपणे निरपराधांचा जीव घेतला त्यावेळी त्याच्या मनात भीती नव्हती पण त्याचे मरण समोर आल्यावर कसाब अस्वस्थ झाला होता, असे सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कसाब यानं आपल्याला दिल्या जाणाऱ्या फाशीच्या शिक्षेची माहिती पाकिस्तानात आपल्या आईला दिली जावी, असं तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं.
विशेष म्हणजे, कसाबला फाशी देताना त्याची अंतिम इच्छा विचारण्यात आली... त्यावर त्याने आपली अंतीम इच्छा काहीच नाही, असं सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. `अल्ला कसम ऐसी गलती दोबारा नही करूंगा` असे त्याचे अखेरचे शब्द होते. निर्विकार चेहऱ्याने तो फाशीला सामोरा गेल्याचे जेल प्रशासनाने सांगितले.