‘आत्मक्लेष नव्हे, आत्मचिंतन करा!’

‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चूक झाली म्हणून ‘आत्मक्लेश’ केला पण राष्ट्रवादीनं विदर्भामध्ये भाजप सेनेशी युती करुन जी चूक केलीय त्यावर त्यांनी आत्मचिंतन करावं’ असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 17, 2013, 10:20 AM IST

www.24taas.com, कोल्हापूर
‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चूक झाली म्हणून ‘आत्मक्लेश’ केला पण राष्ट्रवादीनं विदर्भामध्ये भाजप सेनेशी युती करुन जी चूक केलीय त्यावर त्यांनी आत्मचिंतन करावं’ असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलाय. कोल्हापुरात काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

कोल्हापूरच्या या भाषणात माणिकरावांनी एकाच वेळी अनेकांचा रोष ओढवून घेतलाय. राष्ट्रवादीवर टीका केल्यानंतर त्यांनी मनसे आणि शिवसेनेचाही समाचार घेतला. ‘मनसे आणि शिवसेना या नाण्याच्या दोन बाजू असून ते सत्तेसाठी हपापले’ असल्याची टीका यावेळी माणिकरावांनी केलीय. भाजप मागे राहायला नको म्हणून ‘भाजप राष्ट्री य स्वयंसेवक संघाच्याच ताब्यात आहे. त्यामुळेच मूळचे संघाचे असलेले नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीेय अध्यक्ष झाले आणि संघाचेच देवेंद्र फडणवीस आता प्रदेशाध्यक्ष झाले’ असं म्हणत भाजप हा आरएसएसच्या ताब्यातला पक्ष झाल्याची टीकाही त्यांनी केली.