मनसे नगरसेवकांकडून महापौरांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न!

मनसे नगरसेवकांनी महापौरांना बांगड्यांचा आहेर देऊन त्यांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. रेश्मा भोसले यांनी निवडणूक लढवताना मिळकत कर भरल्याचा दावा केला होता.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 23, 2013, 08:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मिळकत कर बनावट पावतीप्रकरणी पुणे महापालिकेच्या महासभेत मनसे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक एकमेकांना भिडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले आणि नगरसेविका असलेल्या त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे नगरसेवकांनी केली.
यावेळी मनसे नगरसेवकांनी महापौरांना बांगड्यांचा आहेर देऊन त्यांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. रेश्मा भोसले यांनी निवडणूक लढवताना मिळकत कर भरल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात मात्र त्यांनी नंतर मिळकत कर भरला. पण त्यामध्येही फेरफार करण्यात आली. त्यांनी आधीच्या तारखेला मिळकत कर भरल्याची पावती मॅनेज करण्यात आली.
महापालिका निवडणुकीत मिळकत कर भरल्याची खोटी प्रमाणपत्रं सादर केल्या प्रकरणी आमदार अनिल भोसले आणि नगरसेविका रेश्मा भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मनसेची मागणी आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.