www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या काही दिवसांपासून वरूणराजानं राज्यावर कृपादृष्टी दाखवलीय. आणी येत्या काही दिवसांत वरूणराजा असाच बरसणार असल्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली. मुंबईसह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. कुलाबा वेध शाळेनं हा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाली आहे. मुंबईत या आठवड्यात मुंबईला हायटाईडचा इशारा देण्यात आलाय. संततधार पावसामुळं समुद्राला उधाण आलं होतं. तर तिकडे कोकणातही हायटाईडमुळं समुद्राला उधाण आलंय. हायटाईडचा मालवण तालुक्यातील देवबागला बसलाय. देवबागमधल्या १० घरांच्या अंगणात समुद्राचे पाणी घुसलंय.
मध्य रेल्वेच्या लोकल्स अर्धा ते पाऊण तास उशिरानं धावतायत. याबद्दलची कुठलीही सूचनाही देण्यात येत नाहीय. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय. ठाणे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.