www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मुंबई उच्च न्यायालयाची अजित पवार आणि पंतगराव क़दम यांना दणका. पंतगराव क़दम हे महसूल मंत्री असताना, पुण्यातील पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाच्या ताब्यात असलेली जागा हडपण्याचा या दोन्ही मंत्र्यांचा प्रयत्न होता. पण त्यावर आता मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिलीये.
१९६९ पासून पुण्यात पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाच्या ताब्यात असेल्या़ २० एकर जागे पैकी अडीच एकर जागा अजित पवार यांच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि अडीच एकर जागा पंतगराव क़दम यांच्या भारती विद्यापीठाला हस्तांतरीत करण्याचा शासन निर्णय २००९ साली झाला होता. त्या शासन निर्णया विरोधात पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाने रिट याचिका दाखल करुन आव्हान दिले.
गेली अनेक वर्षे हे प्रकणर सुरु असताना आज कोर्टानं या प्रकरणात दोन्ही मंत्र्यांच्या शिक्षण संस्थांना या ज़मिनी हस्तांतरीत करण्यावर स्थगिती आणली आहे.
कोर्टाची स्थगिती म्हणजे अजित पवार आणि पंतगराव क़दम यांना सणसणीत चपराकच असल्याचं बोलंल जातय. तर राज्य सरकारला अशा प्रकारे ज़मीन हस्तांकरण करण्या संबंधी ६ आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.