www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड मधल्या नद्यांच्या प्रदुषणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना काही महिन्यापूर्वी कानपिचक्या दिल्या. पण त्याचा परिणाम महापालिकेवर होताना दिसत नाही.
अजूनही नद्यांच प्रदूषण रोखण्याबाबत पालिका गंभीर नसल्याच समोर आलंय. दरवर्षीप्रमाण यंदाही नद्यांच्या पात्रात जलपर्णी वाढू लागलीय.. पालिकेच मात्र नेहमीसारखं गोलमटोल उत्तर आहे.
पिंपरी चिंचवड शहराच्या वेशीवरून ४६ किलोमीटरची इंद्रायणी नदी वाहते. शहरातून जवळपास २० किलोमीटर एवढ पवना नदीच पात्र वाहतं. तर मुळा नदी आठ किलोमीटर आहे. या तीनही नद्यांची अवस्था काही वेगळी नाही.
बहुतांश कंपन्या रासायनिक पाण्यावर कसलीही प्रक्रिया न करताच पाणी नदीत सोडतात. त्यामुळं पाणी प्रचंड प्रमाणात दूषित झालंय. केमिकलमुळे हे पाणी ना पिण्यासाठी योग्य ना शेतीसाठी. हे प्रदूषण दूर करण्यासाठी पालिका कसली ही उपाय योजना करत नाहीत. हे कमी की काय म्हणून ऐन उन्हाळ्यात सर्वच नद्यांना जलपर्णीनी वेढलंय.
पालिका मात्र प्रदूषण रोखण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत असल्याचा दावा करंतय.
पुणे काय किंवा पिंपरी चिंचवड शहरातल्या नद्यांची अवस्था नाल्यांसारखी झालीय. कोट्यावधी रुपये खर्च केले जातायेत पण ते कशावर हे मात्र दिसत नाही. म्हणूनच झोपी गेलेल्या यंत्रणांना जाग कधी येणार असा प्रश्न उपस्थित होतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.