चक्क अजित पवारांनी पुण्यात मारली दांडी

हिंद केसरी` अमोल बराटे यांचा जाहीर सत्कार समारंभ पुण्यातल्या वारजे येथे पार पडला. मात्र ज्यांच्या हस्ते अमोल यांचा सत्कार होणार होता ते उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनीच या समारंभाकडे पाठ फिरवली. त्यामुळं वारजेकरांमध्ये नाराजी पसरली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 1, 2013, 12:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
हिंद केसरी` अमोल बराटे यांचा जाहीर सत्कार समारंभ पुण्यातल्या वारजे येथे पार पडला. मात्र ज्यांच्या हस्ते अमोल यांचा सत्कार होणार होता ते उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनीच या समारंभाकडे पाठ फिरवली. त्यामुळं वारजेकरांमध्ये नाराजी पसरली.
हिंद केसरीचा किताब पटकावल्यानंतर अमोलवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र पालकमंत्र्यांनाच त्यांचा सत्कार करायला वेळ नसल्यानं काहींनी संतापही व्यक्त केला. विशेष म्हणजे समारंभाला येण्याचं आश्वासन देऊन अजित पवारांनी पाठ फिरवली. ते का आले नाही याचीच जास्त चर्चा रंगली.
खेळाडूच्या पाठिवर कौतुकाची थाप मारण्यास अजित पवारांना वेळ कसा मिळाला नाही? हा सत्कार समारंभ पुण्यात होता. आपल्या घरच्या कार्यक्रमाला `दादा` का आले नाहीत, याचे स्पष्टीकरण न झाल्याने चर्चा अधिक रंगली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ