अजित पवारांनी दिलंय आयुक्तांना अभय

पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांना हटवण्यासाठी पालिकेतील नगरसेवक आणि अधिका-यांनी मोर्चेबांधणी केल्याचे वृत्त दाखविल्यानंतर नगरसेवकांना चांगलाच चाप बसला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 13, 2013, 10:27 PM IST

www.24taas.com,पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांना हटवण्यासाठी पालिकेतील नगरसेवक आणि अधिका-यांनी मोर्चेबांधणी केल्याचे वृत्त दाखविल्यानंतर नगरसेवकांना चांगलाच चाप बसला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची `आयुक्तांना` अभय दिल्याने हटविण्याची झालेले मोर्चे बांधणीचा दबाब कमी झालाय.
आयुक्त परदेशी यांना हटवण्याबाबत जोरदार हालचाल सुरू असल्याचे वृत्त झी २४ तासने दाखवले होते. आयुक्त परदेशी यांच्याबाबतीत अजित पवारच निर्णय घेतील असही दाखवलं होतं. त्याबातमीची दखल घेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिकेतील नगरसेवक, अधिका-यांची आणि आयुक्तांची तब्बल साडेतीन तास बैठक घेतली. या बैठकीत अनेकांनी आयुक्तांना टार्गेत केलंय. त्यांना हटविण्यासाठी हे टार्गेट असल्याचे म्हटलं जात आहे.
आयुक्तांनीही सात महिन्यात केलेली कामे आणि त्याचा झालेला सकारात्मक परिणाम याचा लेखाजोखा दादांसमोर मांडला. आयुक्तांच्या कामाची दखल घेत दादांनी नगरसेवकांची कानउघाडणी केलीय आणि आयुक्तांना अभय दिलंय. त्यामुळे पिंपरी पालिकेतल्या पेल्यातील वादळ शांत झालं. मात्र आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नारज असलेले नगरसेवक आणि अधिकारी किती दिवस शांत बसतात हाच खरा प्रश्न आहे.