हात जोडून होत नाही तर हात सोडून काम करुन घ्या - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी आज नव्या पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली. पुण्याच्या या मेळाव्यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना काही सल्ले देखील दिले.

Updated: Jan 11, 2016, 08:38 PM IST
हात जोडून होत नाही तर हात सोडून काम करुन घ्या - राज ठाकरे title=

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी आज नव्या पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली. पुण्याच्या या मेळाव्यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना काही सल्ले देखील दिले.

'पुण्यातील नागरिकांच्या अडचणी आणि समस्या हात जोडून करुन घ्या, तरी कामे होत नसतील तर हात सोडून मनसे स्टाईलने समस्या सोडवा.' असा सल्ला राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिला.

'हात जोडण्याची भाषा कळत नसेल तर खळ्ळ-खट्याक करावेच लागेल' असंही राज ठाकरे म्हणाले.