www.24taas.com, झी मीडिया, पुणे
चोर सोडून संन्याशाला फाशी या म्हणीचा प्रत्यय सध्या पिंपरी-चिंचवडमधल्या कुत्र्यांना आलाय...
हा सगळा अड्डा जमलाय तो सगळ्या संशयित गुन्हेगारांचा... या सगळ्यांनी अख्ख्या सांगवी परिसराची झोप उडवलीय... गेले २-३ दिवस यांनी नागरिकांना सळो की पळो करून सोडलंय.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागानं कारवाई करत या तब्बल ४० कुत्र्यांना ताब्यात घेतलंय. सांगवी परिसरात तब्बल ४० जणांचा चावा घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या चाळीस जणांना पकडण्यात तर आलंय.
पण तिथंच एक गोंधळ झालाय. यापैकी नक्की कोणत्या कुत्र्यानं चावे घेतलेत, त्याचीच माहिती नाहीय. ज्या कुत्र्यानं चावे घेतलेत, तो पकडला गेलाय की नाही. याची माहिती कुणालाच नाही.
दुसरीकडे सांगवी परिसरातले नागरिक कुत्र्याच्या भितीनं प्रचंड हवालदिल झालेत. पिंपरी-चिंचवड महापालिका कुत्र्यांच्या विरोधात चांगलीच आक्रमक झालीय. पण जो कुत्रा चावतोय, तो पकडला गेला तरच कुत्रे पकडा मोहिमेचं सार्थक होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.