www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. देशभरातील हजारो पर्यटक सध्या उत्तराखंडमध्ये जागोजागी अडकून पडलेले आहेत. गोठणाऱ्या थंडीत, अनेक ठिकाणी जेवणा-पाण्याविना त्यांना रहावं लागतय.
महाराष्ट्र राज्यातूनही हजारो पर्यंटक सध्या उत्तराखंडमध्ये असून, त्यातील अनेक जणांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. उत्तराखंड आणि राज्य सरकारकडून देण्यात येणारी मदत अपुरी ठरतेय. प्रलयानंतर अनेक ठिकाणी पर्यंटकांना मदत मिळण्याऐवजी लूट सुरु असल्याचे प्रकार वाढले आहेत.
महाप्रलयानंतर आता मृतांच्या टाळूनवरचं लोणी खाण्याचे प्रकारही सुरु झाले आहेत. उत्तराखंडमध्ये अडकेल्याले नातेवाईक सोनवटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या ही विदारक परिस्थिती झी २४ तासवर मांडली.उत्तराखंडच्या महाप्रलयात पुण्यातले पर्यटकही अडकलेत. ७० पैकी २० पर्यटकांशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.
हे सर्व पर्यटक शिवगौरी ट्रॅव्हल्स कंपनीसह उत्तराखंडमध्ये गेलेत. त्यांच्यासह या ट्रॅव्हल्स कंपनीचे मालकही आहेत. आमदार विलास लांडे यांनी या पर्यटकांशी संपर्क साधलाय. प्रलयात अडकलेल्या पर्यटकांबाबत सरकारनं दिलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये तफावत असल्याचा आरोप लांडे यांनी केलाय.
मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस उत्तराखंडला रवाना झाले आहेत. मदत आणि बचाव कार्यात समन्वय राखण्यासाठी ते उत्तराखंडला रवाना झाले आहेत. जलप्रलयात अडकलेल्यांमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातले भाविक असल्याच समोर येतयं. रायगडमधील १०२ भाविक या जलप्रलयात सापडल्याचं समोर येतयं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.