www.24taas.com, झी मीडिया, शहापूर
दुष्काळग्रस्त भागाच्या दौ-यावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे असं चित्र पाहायला मिळतंय... ठाकरे काका-पुतणे दुष्काळग्रस्त भागात फिरतायत.. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा सुरु केला आहे. या भागात सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांची राज पाहणी करत आहेत.
दुसरीकडे शिवसेना युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातल्या दुष्काळग्रस्त शहापूर तालुक्याचा दौरा केलाय... इथल्या दोन गावांना पाण्याच्या टाक्यांचे वाटप आदित्य ठाकरे यांनी केलं... राज्यातल्या इतर दुष्काळी जिल्ह्यांप्रमाणे शहापूर तालुक्यातील जरंडी आणि खर्डी या दोन गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोड द्यावं लागतंय..त्यामुळं युवा सेनेच्या माध्यमातून दोन २५-२५ हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या वितरीत करण्यात आल्या.
पाऊस पडेपर्यंत दोन महिने नियमाने टँकर मार्फत रोज पाणी पुरवठाही करण्यात येणार आहे. तसंच मुबई महापालिकेच्या महापौर आणि आयुक्तांशी चर्चा करून ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सुमारे ३५ गावांचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी निकाली काढण्याचं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी शहापूर तालुक्यातील नागरिकांना दिलं.