राज ठाकरेंच्या सोलापुरातील सभेला तुडुंब गर्दी....

`महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौ-याचा दुसरा टप्पा सुरू झालाय. राज काल सोलापूरमध्ये दाखल झाले.

Updated: Feb 22, 2013, 10:28 PM IST

www.24taas.com, सोलापूर
`महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौ-याचा दुसरा टप्पा सुरू झालाय. राज काल सोलापूरमध्ये दाखल झाले. आज त्यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. आज सायंकाळी नॉर्थ कोर्ट मैदानात त्यांची जाहीर सभा होते आहे. राज ठाकरें यांच्या सोलापूरच्या सभेला तुफान गर्दी... तुंडुंब गर्दीने मैदान भरून गेल्याचे चित्र आता सध्या आहे..
राज ठाकरे यांच्या भाषणासाठी मोठ्या प्रमाणात तरूण-तरूणींनी या मैदानावर गर्दी केली आहे. आज राज ठाकरे काय बोलणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. राज्यव्यापी दौऱ्यातील ही त्यांची तिसरी जाहीर सभा आहे. कोल्हापूरमधे त्यानी राष्ट्रवादीचेचे नेते, मंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि आर आर पाटील यांच्यावेर जोरदार टीका केली होती. खेडमधील सभेत नारायण राणे यांच्यावर टीका केली होती.
राज ठाकरे जाहीर सभेत त्या भागातील सरकारमधील नेत्याना लक्ष्य करत आहेत. त्या आनुषंगाने सोलापूरमधे ते केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे तसेच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर काय भाष्य करणार याबद्दल उत्सुकता शिगेला पोचली आहे.