www.24taas.com, सातारा
साताऱ्यातल्या सैनिकी शाळेत प्रवेश प्रक्रियेत गोंधळ घातल्याप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटे वयाचे दाखल्यांच्या सहाय्यानं साताऱ्याच्या सैनिकी शाळेत परप्रांतीय विद्यार्थी प्रवेश घेत असल्याचा आरोप करीत मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता.
वैद्यकीय चाचणीसाठी आलेल्या परप्रांतीय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना हकलण्यात आलं होतं. त्यावरुन सातारा पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह भोसले यांच्यासह १० जणांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. साताऱ्यातल्या सैनिकी शाळेत प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याने मनसैनिकांनी राडा घातला होता.
मनसैनिकांनी परप्रांतीय विद्यार्थी आणि पालकांना सैनिकी शाळेतून हकलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. वयाचे खोटे दाखले सादर करुन परप्रांतियांचा प्रवेश घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करण्यात येतो आहे.