गुजरातमध्ये केजरीवाल यांचा रोड शो थांबवला

`आप`पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचा रोड शो गुजरातमध्ये थांबवण्यात आला आहे.

Updated: Mar 5, 2014, 05:22 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, पाटण
`आप`पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचा रोड शो गुजरातमध्ये थांबवण्यात आला आहे.
आचार संहितेच्या कारणावरून पाटणमधील रोड शो थांबवण्यात आला.
निवडणूक आयोगाने आजपासून आचार संहिता लागू झाल्याची घोषणा केल्यानंतर, अरविंद केजरीवाल यांचा रोड शो थांबवण्यात आला.
आचार संहिता काळात रोड शोसाठी पूर्वपरवानगी घेण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलं.
मात्र आजचं निवडणुकांच्या तारखांची घोषणा आणि आचारसंहिता लागू झाल्याने, आपची कोणतीही पूर्व परवानगी नव्हती.
आपचे नेते योगेंद्र यादव यांनी कोई तो डर गया, है असा ट्वीट केला आहे.
नरेंद्र मोदींच्या गुजरातचा विकास पाहण्यासाठी अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर आहेत.
दरम्यान आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी आली होती.
मात्र संबंधित पोलिस अधिक्षकांनी अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.