बुंदीचे लाडू

साहित्य – एक किलो चण्याच्या डाळीचे पीठ, दीड किलो तूप, दीड किलो साखर

Updated: Oct 22, 2012, 08:17 PM IST

www.24taas.com, मुंबई
साहित्य –
एक किलो चण्याच्या डाळीचे पीठ, दीड किलो तूप, दीड किलो साखर
कृती –
चण्याचे पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे. अर्धी वाटी तापलेले तूप व अर्धा चमचा मीठ व पाणी घालून पीठ भिजवावे. पिठात गोळी होऊ देऊ नये. कढईत तूप तापत ठेवून, कढईवर बुंदीचा झारा ठेवून, त्या झार्या्वर वरील पीठ घालावे व झारा आपटून आपटून तुपात कळ्या पाडाव्यात. या प्रमाणे सर्व पिठाच्या कळ्या पाडून घ्याव्या. साखरेचा पाक करत ठेवावा. एकतारीपेक्षा थोडा जास्त पाक करावा. कळ्या पाकात टाकाव्यात तास, दीड तासाने लाड़ वळता येईल. लाडू कमी गोड हवे असल्यास साखर कमी घालावी. एक किलो चण्याचे पीठ घेतल्यास अंदाजे पन्नास ते साठ लाडू होतात.