चकली

साहित्य : ५ वाट्या चकल्यांची भाजणी, १/२ वाटी तेल, ४ चमचे तिखट, ४ चमचे मीठ, २ चमचे तीळ, तेल तळण्याकरता.

Updated: Oct 22, 2012, 05:44 PM IST

www.24taas.com, मुबंई
साहित्य -
५ वाट्या चकल्यांची भाजणी, १/२ वाटी तेल, ४ चमचे तिखट, ४ चमचे मीठ, २ चमचे तीळ, तेल तळण्याकरता.
कृती –
एका पातेल्यात दोन वाट्या पाणी, तेल, तिखट, मीठ सगळे एकत्र करून गॅसवर उकळत ठेवावे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून त्यात चकल्यांची भाजणी व एक वाटी गार पाणी घालून एकत्र करावे व भाजणी झाकून ठेवावी. साधारण एक-दीड तासाने तीळ घालून गरजेप्रमाणे पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यावे. भाजणी मळून घेतल्यानंतर ते पीठ चकलीच्या साच्यात घालून साधारण मध्यम आकाराच्या चकल्या पाडाव्यात.
मध्यम आकाराच्या चकल्या करण्यासाठी साच्याने दोन ते तीन विळखे घालावेत. तेल नीट तापले की मगच चकल्या तळाव्यात. ते कळण्यासाठी त्यात एक छोटा गोळा टाकून पहावा, तो नीट तळला गेला की मगच चकल्या तळाव्यात. चकल्या कायम मध्यम आंचेवर तळाव्यात. मंद किंवा मोठ्या आंचेवर तळल्या तर मऊ किंवा कडकडीत होऊ शकतात.