वानखेडेच्या ग्राउंडसमननी केला सचिनचा सत्कार

मास्टरब्लास्टर सचिनची अखेरची कसोटी. क्रिकेटचा देवता असलेल्या आपल्या लाडक्या सचिनचा अखेरचा निरोपाचा सामना ज्या खेळपट्टीवर होणार आहे, ती खेळपट्टी आम्ही पंधरा दिवस खपून बनवली आहे, त्यावर सचिनने शतक ठोकावे बस्स ! हीच आमची इच्छा, अशी भावना वानखेडे ग्राउंडसमननी व्यक्त केली आहे.

Updated: Nov 15, 2013, 10:28 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मास्टरब्लास्टर सचिनची अखेरची कसोटी. क्रिकेटचा देवता असलेल्या आपल्या लाडक्या सचिनचा अखेरचा निरोपाचा सामना ज्या खेळपट्टीवर होणार आहे, ती खेळपट्टी आम्ही पंधरा दिवस खपून बनवली आहे, त्यावर सचिनने शतक ठोकावे, हीच आमची इच्छा. ही भावना व्यक्त केली आहे वानखेडेच्या ग्राउंडसमननी.
गेल्या २५ वर्ष सचिन आणि ग्राउंडसमनचे जिव्हाळयाचे नाते आहे. वानखेडेने बॉलबॉयपासून ते मास्टरब्लास्टरपर्यंत सचिनच्या सर्व रूपांशी परिचित आहे. इथे त्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले तर अनेक विक्रमही त्याने रचले. सचिनच्या या वाटचालीचे साक्षीदार असणाऱ्या ग्राउंडसमननी सचिनचा सत्कार केला. सचिनने आपुलकीने सर्वांची विचारपूस केल्यानंतर त्यांना गहिवरून आले.
मुख्य ग्राउंडसमन विजय तांबे म्हणाले. सचिनने द्विशतकी कसोटीत शतक ठोकून आपल्या दैदीप्यमान कारकर्दीला सलाम ठोकावा. क्रिकेटच्या या देवाला शतकी यश लाभो म्हणून त्यांनी साक्षात देवालाही साकडे घातले. असे रमेश म्हामुणकर यांनी सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.