सचिनच्या चाहत्यांची पवारांविरोधात घोषणाबाजी

वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या मॅचची तिकिटं मिळवण्यासाठी चाहत्यांनी रात्रीपासूनच रांग लावली. मात्र सकाळी अचानक तिकिटं ऑनलाईन देणार असल्याचं घोषित झाल्यावर क्रिकेटप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 11, 2013, 12:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या मॅचची तिकिटं मिळवण्यासाठी चाहत्यांनी रात्रीपासूनच रांग लावली. मात्र सकाळी अचानक तिकिटं ऑनलाईन देणार असल्याचं घोषित झाल्यावर क्रिकेटप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
वानखेडेवर येत्या ११ नोव्हेंबरपासून सचिन तेंडुलकर आपल्या क्रिकेट करिअरमधली अखेरची टेस्ट खेळणार आहे. त्या टेस्टच्या तिकीटासाठी सचिनच्या चाहत्यांनी वानखेडे स्टेडियमवर रात्रभर रांगा लावल्या होत्या. रात्रभर स्टेडियम प्रशासनाकडून काहीही माहिती सांगण्यात आली नाही. मात्र सकाळी ऑनलाईन तिकीट मिळणार असल्याची माहिती देण्यात आल्यामुळे चाहत्यांनी एमसीए आणि पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
या २०० व्या टेस्ट मॅचच्या वेळेस वानखेडे स्टेडिअम आणि जवळच्या भागाला छावणीचे स्वरुप देण्यात आलंय. १००० पोलीस स्टेडिअमच्या आत आणि बाहेर सुरक्षेसाठी ठेवण्यात येणार आहे. त्याच बरोबर राज्य राखीव दल, शिघ्र कृती दल आणि दंगल नियंत्रक दलांच्या तुकड्या देखील वानखेडे स्टेडियमला घेराव घालणार आहेत. स्टेडिअममध्ये येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जाईल आणि ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही स्टेडिअमच्या आत सोडलं जाणार नाही. एवढचं नाही तर स्टेडिअम मध्ये कोणतीही वस्तू नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.