www.24taas.com, चिपळूण
साहित्य संमेलनाचा उत्साह चिपळुणात ओसंडून वाहतोय.. यातच चिपळुणकरांनी एक वेगळा अनुभव घेतला.. रस्त्यावर अचानक फ्लॅशमॉब करण्यात आला. आणि सर्व चिपळूणकर भारावून गेले. ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, मावळते अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके, स्वागताध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्याआधी सकाळी साडेआठ ते साडेदहा या कालावधीत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असून तिचे उद्घाटन चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
त्यानंतर संमेलनस्थळी आयोजित आलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन वसंत डहाके करतील. दुपारी ३.३० वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल