www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी सध्या पुण्याच्या येरवडा तुरुंगात असलेला कैदी आणि अभिनेता संजय दत्त हा सुद्धा उत्तराखंड पीडितांची दशा ऐकून हेलावून गेलाय. या पीडितांना मदत करण्याची इच्छा त्यानं पत्नी मान्यतासमोर व्यक्त केलीय.
संजय दत्त याचा येत्या शुक्रवारी ‘पोलीसगिरी’ हा चित्रपट प्रसिद्ध होत आहे. या चित्रपटाचा ग्रॅन्ड प्रिमिअर दुबईत होणार आहे. चित्रपट निर्माते टी. पी. अग्रवाल यांनी ही गोष्ट काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती. पण, या चित्रपटाचा अभिनेता संजय दत्त याला मात्र ही गोष्ट रुचलेली नाही. या चित्रपटाच प्रिमिअर कोणताही गाजावाजा न करता मुंबईतच केला जावा, अशी इच्छा त्यानं व्यक्त केली. या प्रिमिअरद्वारे आणि चित्रपटाद्वारे निधी गोळा करून तो उत्तराखंड पीडितांना सुपूर्द करण्यात यावा, असंही संजयनं म्हटलंय.
पत्नी मान्यता हिला पत्र लिहून संजयनं आपली इच्छा व्यक्त केलीय. पोलिसगिरीद्वारे केलेली संजयची ही गांधिगिरी निर्मात्यांनाही भावलीय. संजयच्या या मागणीचा गांभीर्याने विचार केला जाईल, असं त्यांनी म्हटलंय.
तुरुंगात गेल्यानंतर मुंबई - अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोषी ठरलेला अभिनेता संजय दत्त सध्या जेलमधून गांधीगिरी करताना दिसून येत आहे. त्याच्या शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या "पुलिसगिरी` या चित्रपटाचा प्रीमियर दुबईऐवजी मुंबईतच साधेपणाने करावा, तसेच यावेळी उत्तराखंडमधील पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करावा, अशा आशयाचे पत्र त्याने तुरुंगातून आपली पत्नी मान्यता हिला पाठविले आहे.
येरवडा जेलमध्ये रवानगी झाल्यानंतर संजय दत्तचा हा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ग्रॅण्ड प्रीमियर दुबई येथे ठेवण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वी निर्माते टी. पी. अग्रवाल यांच्यावतीने सांगण्यात आले होते. "पुलिसगिरी` या चित्रपटाचा मोठा गाजावाजा न करता त्याचा प्रीमियर मुंबईतच करण्यात यावा. यावेळी उत्तराखंडमधील पुनर्वसन कार्यासाठी निधी गोळा करून तिकडे पाठवावा, असे आवाहन संजयने केले आहे. या आवाहनाचा गांभीर्याने विचार केला जात असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले.
टाडा कोर्टासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर संजय दत्तचा ‘पोलिसगिरी’ हा पहिलाच सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.