विराटबद्दल तुम्हांला माहीत नसलेल्या ९ गोष्टी

भारताचा तडाखेबंद फलंदाज विराट कोहली बद्दल अशा ९ गोष्टी ज्या प्रत्येक भारतीयांना माहिती पाहिजे.

Updated: Mar 28, 2016, 10:14 PM IST
विराटबद्दल तुम्हांला माहीत नसलेल्या ९ गोष्टी  title=

नवी दिल्ली :  भारताचा तडाखेबंद फलंदाज विराट कोहली बद्दल अशा ९ गोष्टी ज्या प्रत्येक भारतीयांना माहिती पाहिजे.

विराटबद्दल न माहीत असलेल्या ९ गोष्टी 

१) विराट कोहली फक्त खेळामध्ये नाही तर मनानेही चांगला आहे. त्याने गरीब मुलांसाठी 'विराट कोहली फाऊंडेशन' नावाची संस्था सुरू केली आहे. ही संस्था लहान मुलांसाठी फंड जमा करते. 

२) विराट कोहलीचे टोपण नाव 'चिकू' आहे. हे नाव दिल्ली स्टेट कोच अजित चौधरी यांनी दिले आहे. 

३) विराट कोहलीला टॅटूची आवड आहे. विराटच्या शरिरावर ४ टॅटू आहे. त्यात त्याचा फेव्हरेट समुराई योद्धा आहे. 

४) विराटला पंजाबी म्युझिक खूप पसंद आहे. 

५) विराट कोहलीच्या करिअरची खूप दुःखी सुरूवात झाली. त्याच्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी विराट कोहलीच्या रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाचा सामना होता. वडीलांचे निधन झाले तरी विराटने या सामन्यात ९० धावांची झुंझार खेळी केली. 

६) विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या अफेअर आणि ब्रेकअपबद्दल सर्वांना माहीत आहे. पण त्याचे पहिले क्रश करिश्मा कपूर होती, त्याला लहानपणापासून ती आवडायची. 

७) विराटला आपल्या आईच्या हाताची चिकन बिर्यानी खूप आवडते. 

८) विराटने कबूल केले की तो अंध विश्वासू आहे. तो आपल्या हातात तो नेहमी काळा धागा बांधतो, तो त्याला लकी मानतो. 

९) विराट कोहलीने एका मुलाखतीत सांगितले की त्याचा आयुष्यात खूप उतार चढाव आलेत. लहान वयात वडिलांचे छत्र हरपले. फॅमिली बिझनेस तोट्यात होता. तो भाड्याच्या घरात राहत होता.