मुंबई: टीम इंडियाचा विकेट कीपर बॅट्समन दिनेश कार्तिक पुढील महिन्यात स्कॉश खेळाडू दीपिका पल्लिकलसोबत विवाहबंधनात अडकरणार आहे. विशेष म्हणजे दे दोन खेळाडू दोन वेळा लग्न करणार आहेत. पहिल्यांदा १८ ऑगस्टला आणि दुसऱ्यांदा २० ऑगस्टला दोघांचा विवाह होईल.
दीपिका ख्रिश्चन आहे म्हणून १८ ऑगस्टला ख्रिश्चन पद्धतीनं हा विवाह होईल आणि २० ऑगस्टला तेलुगू नायडू पद्धतीनं विवाहबंधनात अडकतील. दोन्ही पद्धतीनं विवाह चेन्नईत होणार आहे.
दीपिकाचे वडील संजीव पल्लिकल यांनी सांगितलं की, 'ख्रिश्चन पद्धतीनं लग्न १८ ऑगस्टला होईल आणि हिंदू पद्धतीनं २० ऑगस्टला कार्यक्रम होईल. लग्नाला केवळ जवळच्या लोकांना बोलवण्यात येणार आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये तयारी सुरू आहे.'
Its such a thoughtful gesture!Totally love the #couplebands @StyloriLove ! Thank You!#stylori #TogetherWithStylori pic.twitter.com/w726pJwIfl
— Dipika Pallikal (@DipikaPallikal) May 29, 2015
एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार दीपिका १८ ऑगस्टला व्हाइट गाऊनमध्ये दीपिका असेल तर २० ऑगस्टला पिवळ्या साडीत दिसेल. लग्नापूर्वी दीपिका आपल्या मित्रमैत्रिणींना खास मेहंदीची पार्टीही देणार आहे. दिनेश-दीपिकाचा नोव्हेंबर २०१३मध्ये साखरपुडा झाला होता.
दिनेश-दीपिका यांच्या लग्नाच्या वेळी टीम इंडियातील अनेक खेळाडू हे श्रीलंका दौऱ्यावर असतील. १२ ऑगस्टपासून श्रीलंकेविरोधात तीन टेस्ट मॅचची सीरिज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.