शेवटच्या मॅचनंतर आफ्रिदी बरळला

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधलं पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Updated: Mar 25, 2016, 08:00 PM IST
शेवटच्या मॅचनंतर आफ्रिदी बरळला title=

मोहाली: यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधलं पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानच्या टीमला सपोर्ट केल्याबद्दल मी काश्मीरमधल्या जनतेचे आभार मानतो असं आफ्रिदी म्हणाला आहे. 

भारताविरुद्धच्या कोलकत्यातल्या मॅचवेळी आम्हाला सपोर्ट करणाऱ्या तसंच या मॅचमध्ये पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या पाकिस्तानातल्या आणि काश्मिरमधल्या फॅन्सचे मी आभार मानतो, असं आफ्रिदी म्हणाला. 

याआधीही न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचआधी टॉसच्या वेळीही आफ्रिदीनं हेच वक्तव्य केलं होतं. त्यावेळी बीसीसीआयचे सचिव आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी आफ्रिदीवर टीका केली होती. 

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये शाहिद आफ्रिदी हा वादामध्येच राहिला आहे. पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम मला भारतात मिळतं, असं आफ्रिदी या वर्ल्ड कपच्या सुरवातीलाच म्हणला होता. यावर पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी आफ्रिदीवर जोरदार टीका केली होती. 

आता काश्मिरबाबतच्या या वक्तव्यानं नवा वाद निर्माण व्हायची शक्यता आहे.