लिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलीय. 

Updated: Jun 27, 2016, 11:03 AM IST
लिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा title=

नवी दिल्ली : अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलीय. 

कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाचा पराभव झाल्यानंतर मेस्सीनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. कोपा अमेरिका स्पर्धेत एका पेनल्टी किकवर गोल करण्यात मेस्सीला अपयश आलं होतं. 

त्यानंतर काही वेळातच मेस्सीनं हा निर्णय घेतलाय. मेस्सीनं आंतरराष्ट्रीय फूटबॉलमधून निवृत्ती घेणं, हा फुटबॉल विश्वासाठी मोठा धक्का मानला जातोय. 

कोप अमेरिका स्पर्धेत चिलीने अर्जेंटिनाचा पराभव करत दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले.