सर जडेजाची टीम इंडियात पुनरागमन

 ऑलराउंडर रविंद्र जडेजा याला जवळपास १४ महिन्यानंतर टीम इंडियाचा टेस्ट टीमध्ये स्थान मिळाले आहे. पहिल्या दोन टेस्टसाठी १६ सदस्यांच्या टीममध्ये त्याला स्थान देण्यात आले आहे. 

Updated: Oct 19, 2015, 05:59 PM IST
सर जडेजाची टीम इंडियात पुनरागमन  title=

मुंबई :  ऑलराउंडर रविंद्र जडेजा याला जवळपास १४ महिन्यानंतर टीम इंडियाचा टेस्ट टीमध्ये स्थान मिळाले आहे. पहिल्या दोन टेस्टसाठी १६ सदस्यांच्या टीममध्ये त्याला स्थान देण्यात आले आहे. 

निवड समितीने अखेरच्या दोन सामन्यात उमेश यादवच्या जागेवर फास्ट गोलंदाज श्रीनाथ अरविंद याला संधी दिली आहे. 

संदीप पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली निवड समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी टीमची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेच्या पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ने आघाडी घेतली आहे. अंतीम दोन सामने चेन्नई आणि मुंबईमध्ये खेळविण्यात येणार आहे. 

टेस्ट मालिका पाच नोव्हेंबरपासून मोहालीतून सुरू होणार आहे, तर इतर तीन सामने बेंगळुरू, नागपूर आणि दिल्ली येथे होणार आहेत. 

टीम अशा प्रकारे: 
एकदिवसीय टीम (अंतिम दो वनडेसाठी) 
महेंद्र सिंह धोनी : कप्तान:, रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अक्षर पटेल, हरभजन सिंह, अमित मिश्रा, मोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, एस अरविंद, स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायडू आणि गुरकीरत मान।

भारतीय टेस्ट टीम : 
पहिल्या दोन टेस्टसाठी : विराट कोहली :कप्तान:, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, लोकेश राहुल, स्टुअर्ट बिन्नी, वरूण आरोन आणि इशांत शर्मा।

बोर्ड अध्यक्ष इलेवन :
चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, उन्मुक्त चंद, करूण नायर, श्रेयष अय्यर, नमन ओझा, हार्दिक पांड्या, जयंत यादव, कुलदीप यादव, शारदुल ठाकुर, नाथु सिंह, कर्ण शर्मा आणि शेल्डन जैकसन 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.