२३ वर्षाच्या या क्रिकेटरने केली तेंडुलकरची बरोबरी

राजकोट वन डेमध्ये या दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर क्विंटन डी कॉन याने शानदार शतक लगावले. १०३ धावा बनवून तो बाद झाला. पण या फलंदाजाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. 

Updated: Oct 19, 2015, 05:38 PM IST
२३ वर्षाच्या या क्रिकेटरने केली तेंडुलकरची बरोबरी  title=

राजकोट : राजकोट वन डेमध्ये या दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर क्विंटन डी कॉन याने शानदार शतक लगावले. १०३ धावा बनवून तो बाद झाला. पण या फलंदाजाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. 

डी कॉकचे भारताविरूद्ध चौथे वन डे शतक 
क्विंटन डी कॉक याने भारताविरूद्ध चौथे शतक झळकावले आहे. भारतात विरोधात त्याने सात डाव खेळून चार शतक लगावले आहेत. कोणत्याही टेस्ट खेळणाऱ्या देशाविरोधात सर्वात चांगले प्रदर्शन आहेत. 

तेंडुलकरपेक्षा वरचढ आहे डी कॉक 
सचिन तेंडुलकने केन्या विरूद्ध आपल्या पहिल्या सात खेळींमध्ये चार शतक लगावले आहेत. पम केनिया आणि भारताच्या गोलंदाजींच्या स्तरामध्ये अंतर आहे. त्यामुळे डी कॉक हा सचिन पेक्षा याबाबतीत वरचढ ठरला आहे. 

डी कॉकचे सातवे शतक, पण सचिन वरचढ
क्विंटन डी कॉक याने आतापर्यंत सात वन डे शतक केले आहेत. वन डे क्रिकेट इतिहासात २३ व्या वर्षी सात शतक लगावणारे तीन फलंदाज आहे. त्यात सचिन तेंडुलकर वरचढ दिसतो आहे. सचिनने २३ व्या वर्षी आठ शतक केले होते. तर विराटने सात शतक केले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.