...आणि अश्विन ट्विटरवर भडकला

क्रिकेट भारतातील लोकप्रिय खेळ आहे. तितकेच लोकप्रिय भारतीय क्रिकेटरही. जेव्हा एखादा सामना भारत जिंकतो तेव्हा या क्रिकेटपटूंवर स्तुतीस्तुमने उधळली जातात. मात्र भारत हरला की याच क्रिकेटपटूंना टीकेचे लक्ष्य बनवले जाते. शनिवारी असाच काहीचा प्रकार पाहायला मिळाला. ट्विटरवरुन एका क्रिकेट चाहत्याने भारताचा फिरकीपटू आर. अश्विनवर टीका केली. 

Updated: Dec 13, 2015, 11:18 AM IST
...आणि अश्विन ट्विटरवर भडकला title=

नवी दिल्ली : क्रिकेट भारतातील लोकप्रिय खेळ आहे. तितकेच लोकप्रिय भारतीय क्रिकेटरही. जेव्हा एखादा सामना भारत जिंकतो तेव्हा या क्रिकेटपटूंवर स्तुतीस्तुमने उधळली जातात. मात्र भारत हरला की याच क्रिकेटपटूंना टीकेचे लक्ष्य बनवले जाते. शनिवारी असाच काहीचा प्रकार पाहायला मिळाला. ट्विटरवरुन एका क्रिकेट चाहत्याने भारताचा फिरकीपटू आर. अश्विनवर टीका केली. 

यंदाच्या वर्षात अश्विनची कामगिरी चांगली राहिली. श्रीलंका दौऱ्यात त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारताने विजय मिळवला. यात अश्विनचे मोलाचे योगदान राहिले. त्याने गेल्या नऊ कसोटीत ६२ विकेट घेत चांगला रेकॉर्ड केला. मात्र चाहते हे अखेर चाहते आहेत. अश्विनच्या चांगल्या कागिरीनंतरही एका चाहत्याने त्याच्यावर टीका केली. अश्विनची परदेशात चांगली कामगिरी नसल्याची टीका या चाहत्याने केली. 

'आशियामध्ये तुम्ही चांगली कामगिरी करु शकता. बाहेर नाही. काही लोकांनी तुमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली आहे.' असे त्याने म्हटले. या ट्विटनंतर अश्विनचा पारा चढला. त्याने रिप्लाय देताना, 'तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणावर लक्ष द्या. माझ्याबद्दल जास्त विचार करु नका. क्रिकेट खेळण्याआधी मी काय तुमची परवानगी घेतली होती का?'असे अश्विनने म्हटले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.