आर.अश्विन-वृद्धीमान सहानं भारताला सावरलं

तिसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं संयमी सुरुवात केली आहे. 

Updated: Aug 11, 2016, 08:27 AM IST
आर.अश्विन-वृद्धीमान सहानं भारताला सावरलं title=

सेंट लुशिया : तिसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं संयमी सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजनं एक आऊट 107 पर्यंत मजल मारली होती. वेस्ट इंडिजचा ओपनर क्रेग ब्रेथवट नाबाद 53 तर डॅरेन ब्रॅव्हो नाबाद 18 रनवर खेळत आहे. 

दरम्यान भारताची पहिली इनिंग 353 रनवर आटोपली. भारताकडून आर.अश्विन आणि वृद्धीमान सहानं सेंच्युरी झळकवली. या दोघांनी तब्बल 213 रनची पार्टनरशीप केली. 

आर. अश्विननं सिक्स मारून सेंच्युरी पूर्ण केली. टेस्ट क्रिकेटमधली अश्विनची ही चौथी सेंच्युरी आहे. मुख्य म्हणजे अश्विननं या चारही सेंच्युरी वेस्ट इंडिजविरुद्धच झळकावल्या आहेत.