टेस्टमध्ये अश्विनचा विक्रम, सर्वात जलद 200 विकेट घेणारा पहिला भारतीय

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Updated: Sep 25, 2016, 04:48 PM IST
टेस्टमध्ये अश्विनचा विक्रम, सर्वात जलद 200 विकेट घेणारा पहिला भारतीय title=

कानपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विननं विश्व विक्रम केला आहे. अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला आहे.

तर आंतरराष्ट्रीय बॉलर्समध्ये अश्विन जलद 200 विकेट घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा विक्रम करायला अश्विनला 37 टेस्ट लागल्या. ऑस्ट्रेलियाच्या क्लॅरी ग्रिमेटनं 36 टेस्टमध्ये 200 विकेटचा पल्ला गाठला होता. हेच रेकॉर्ड करायला डेनिस लिली आणि वकार युनुसला 38 टेस्ट तर डेल स्टेनला 39 टेस्ट लागल्या होत्या.