close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये फेडरर-नदालची लढत

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफाएल नदाल आणि रॉजर फेडररमध्ये ड्रीम फायनल रंगणार आहे. 

Updated: Jan 29, 2017, 09:27 AM IST
ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये फेडरर-नदालची लढत

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफाएल नदाल आणि रॉजर फेडररमध्ये ड्रीम फायनल रंगणार आहे. 

जवळपास सहा वर्षांनी फेडरर-नदाल एखाद्या ग्रँडस्लॅममध्ये आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे टेनिस चाहत्यांना या मॅचच्या निमित्तानं एक अनोखी पर्वणी मिळणार आहे. दुखापतीतुन सावरलेल्या नदालनं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपल्या खेळानं सा-यांनाचच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. 

आता फायनलच्या लढतीत फेडररवर मात करण्यासाठी तो सज्ज आहे. याआधी 2011 च्या फ्रेंच ओपनमध्ये नदाल आणि फेडरर आमने-सामने आले होते. त्यावेळी नदाल सरस ठरला होता. 

दोन्ही टेनिसपटू दुखापतीतून सावरत कमबॅक करतायत. त्यामुळे ही लढत कोण जिंकणार याकडे तमाम टेनिसप्रेमींचं लक्ष असणार आहे.