नवी दिल्ली : बांगलादेशचा कर्णधार मुशफिकर रहीमने भारताविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात संघ चांगली कामगिरी करणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय.
आम्ही संपूर्ण दुनियेला हे दाखवू इच्छितो की आम्ही भारतात काय करु शकतो. आम्ही किती वर्षांनी भारतात खेळायला जातोय याबाबत मी विचार करत नाहीये. मात्र आम्ही असा खेळ करणार आहोत ज्यामुळे भारत आम्हाला पुन्हा बोलावेल, असे रहीम यावेळी म्हणालाय
बांगलादेश भारत अ संघाविरुद्ध दोन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर बांगलादेश आणि भारत यांच्यात एक कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
या सामन्याबाबत बोलताना रहीम म्हणाला, आमच्याकडे संतुलित संघ आहे. ज्यात वेगवान गोलंदाज, स्पिनर आणि फलंदाज आहेत. भारतासमोर आमच्या फलंदाजांचे मोठे आव्हान असेल. आम्ही चांगला सांघिक खेळ केला तर कोणत्याही संघाला आम्ही हरवू शकतो.