ढाका : बांगलादेशची टीम यंदाच्या वर्ल्ड कपमधून बाहेर झाली आहे, मात्र पुढचा वर्ल्ड कप बांगलादेशच जिंकणार असल्याची भविष्यावाणी बांगलादेशचे खेळ मंत्री बिरेन सिंकदर यांनी केली आहे.
या वर्ल्ड कपमधून बाहेर झाली याला सर्वस्वी अंपायरिंग जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बिरेन मागुरा येथील कॉलेजमधील एका कार्यक्रमामध्ये बोलत असतांना, पुढचा वर्ल्ड कप जिंकून बांगलादेशचे खेळाडू ICCला उत्तर देतील असे त्यांनी सांगितले.
तसेच भरपूर मेहनत करून इतर टीमप्रमाणे आमची टीमही इतिहास रचेल असेही ते म्हणाले. याआधीही बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी बांगलादेशला जाणूनबूजून हरवल्याचे बोलले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.