मेरी कोमचे ऑलिंपिकसाठी क्वालिफायचे स्वप्न संपुष्टात

पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमचं सलग दुस-यांदा ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होण्याचं स्वप्न भंग पावलंय. 

Updated: May 22, 2016, 08:21 AM IST
मेरी कोमचे ऑलिंपिकसाठी क्वालिफायचे स्वप्न संपुष्टात

नवी दिल्ली : पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमचं सलग दुस-यांदा ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होण्याचं स्वप्न भंग पावलंय. 

वर्ल्ड बॉक्सिगं चॅम्पियनशिपच्या दुस-या राऊंडमध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला. 51 किलो वजनीगटात 2012 मध्ये ब्राँझ मेडल जिंकणा-या मेरीला दुस-या राऊंडमध्ये जर्मनीच्या अॅझेी निमानीकडून 0-2 नं पराभवाची चव चाखावी लागली. 

वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करणा-या बॉक्सरलाचा रियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळणार होतं. त्याचप्रमाणे रियोसाठी क्वालिफाय होण्यासाठी ही वुमेन्स बॉक्सर्ससाठी अखेरची संधी होती.