ऑलिम्पिकला जायचं मेरी कोमचं स्वप्न भंगलं

पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेली मेरी कोमचं सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकला जायचं स्वप्न भंगलं आहे. 

Updated: May 21, 2016, 06:46 PM IST
ऑलिम्पिकला जायचं मेरी कोमचं स्वप्न भंगलं

अस्ताना: पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेली मेरी कोमचं सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकला जायचं स्वप्न भंगलं आहे. वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मेरी कोमचा पराभव झाला आहे. 

लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावणाऱ्या मेरी कोमचा दुसऱ्या राऊंडमध्ये जर्मनीच्या अजीजे निमानीनं 0-2 असा पराभव केला. या चॅम्पियनशीपमध्ये मेरी कोम सेमी फायनलमध्ये पोहोचली असती तर रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी ती पात्र झाली असती.