चुकीच्या निर्णयामुळे भारताचा पुजारा 'आऊट'; चिडला क्लार्क!

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्याच दिवशी चेतेश्वर पुजाराला 'आऊट' म्हणून घोषित करण अंपायर इयान गोल्ड यांना भारी पडतंय. 

Updated: Dec 17, 2014, 12:13 PM IST
चुकीच्या निर्णयामुळे भारताचा पुजारा 'आऊट'; चिडला क्लार्क! title=

ब्रिसबेन : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्याच दिवशी चेतेश्वर पुजाराला 'आऊट' म्हणून घोषित करण अंपायर इयान गोल्ड यांना भारी पडतंय. 

क्रिकेट जगतात त्यांच्या या चुकीच्या निर्णयावर जोरदार निंदा होताना दिसतेय. केवळ क्रिकेट प्रेमीच नव्हे तर ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कनंही या निर्णयावर टीका केलीय.

हेजलवुडनं टाकलेल्या ज्या बॉलवर पुजाराला आऊट घोषित केलं गेलं... तो बॉल पुजाराच्या हेल्मेटला लागून जाताना दिसला होता... आणि याच वेळी अंपायर गोल्ड यांनी पुजाराला आऊट घोषित केलं.

अंपायर गोल्ड यांच्या याच निर्णयावर टीका करत क्लार्कनंही आपली नाराजी सोशल वेबसाईटवर व्यक्त केलीय. 'हा काही योग्य निर्णय नव्हता' असं क्लार्कनं म्हटलंय.

यासोबतच, ऑस्ट्रेलियाकडून पहिलीच टेस्ट मॅच खेळत असलेल्या जॉश होजलवुडची पहिली टेस्ट विकेटही वादग्रस्त ठरलीय. अर्थातच, या चुकीच्या निर्णयाचा त्याच्या करिअरवर परिणाम होणार नाही.

खिलाडू वृत्तीच्या क्लार्कनं मुरली विजयनं सेन्चुरी ठोकल्यानंतर त्याचंही अभिनंदन केलंय.
Congrats M Vijay, very good 100

हार्मस्ट्रिंगचा त्रास घालवण्यासाठी ३३ वर्षांच्या मायकल क्लार्कला लवकरच एका छोट्या शस्त्रक्रियेमधून जावं लागणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.