कॉमनवेल्थ स्पर्धा : मोदींनी दिल्यात ट्विटरवरून शुभेच्छा

ग्लास्गो येथे सुरू होणा-या कॉमनवेल्थ गेम्सकरता भारतीय अॅथलिट्स सज्ज झाले आहेत. दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान भारतीय अॅथलिट्ससमोर असणार आहे. स्पर्धेदरम्यान भारतीय अॅथलिट्सचं मनोबल उंचावण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: Jul 23, 2014, 04:06 PM IST
कॉमनवेल्थ स्पर्धा : मोदींनी दिल्यात ट्विटरवरून शुभेच्छा  title=

लंडन : ग्लास्गो येथे सुरू होणा-या कॉमनवेल्थ गेम्सकरता भारतीय अॅथलिट्स सज्ज झाले आहेत. दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान भारतीय अॅथलिट्ससमोर असणार आहे. स्पर्धेदरम्यान भारतीय अॅथलिट्सचं मनोबल उंचावण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्लास्गो कॉमनवेल्थ गेम्सची ओपनिंग सेरेमनी स्कॉटलंडच्या प्रसिद्ध अशा सेल्टिक पार्क मैदानावर रंगणार आहे. सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या ओपनिंग सेरेमनीचं इंग्लंडच्या क्वीन एलिझाबेथ सेकंड यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने उद्घाटन होणार आहे. 

दोन तास रंगणा-या या ओपनिंग सेरेमनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचीही विशेष उपस्थिती असणार आहे. सचिन तेंडुलकर हा युनिसेफचा ब्रँड अँबेसेडर असल्याने सचिन हजर असेल. 2 हजार कलाकारांचा सहभाग असलेल्या या ओपनिंग सेरेमनीमध्ये लोकप्रिय गायक रॉट स्टुअर्ट, सुसान बॉयले, अॅमे मॅकडोनाल्डसह व्हायोलिन वादक निकोला बेनेडेड्री यांच्या कार्यक्रमाचे आकर्षण असेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.