आपल्याला ‘न ओळखणाऱ्या’ मारियाबद्दल सचिन म्हणतो...

मारिया शारापोव्हा हिच्या ‘कोण सचिन तेंडुलकर?’ या प्रश्नाला सचिननं आज पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 

Updated: Jul 23, 2014, 01:15 PM IST
आपल्याला ‘न ओळखणाऱ्या’ मारियाबद्दल सचिन म्हणतो...  title=

नवी दिल्ली : मारिया शारापोव्हा हिच्या ‘कोण सचिन तेंडुलकर?’ या प्रश्नाला सचिननं आज पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 

टेनिस सम्राज्ञी क्रिकेटच्या देवाला ओळखत नाही... मात्र, मास्टर ब्लास्टर मारियाच्या अनेक मॅचेसना उपस्थित राहिलाय... त्यामुळे, मारिया शारापोव्हा हिच्या टिप्पणीबद्दल काय वाटतंय, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना होती. 

सचिनच्या म्हणण्यानुसार, मारियाची हे वक्तव्य त्याला अजिबातच अपमानजनक वाटत नाहीय. यामागचं कारण, म्हणजे सचिनला माहित आहे की, ही स्टार टेनिस खेळाडू क्रिकेट पाहत नाही. एका इंटरव्ह्युमध्ये बोलताना सचिननं आपली प्रतिक्रिया दिलीय.

विम्बल्डन ट्रॉफी घशात घातल्यानंतर, ‘कोण सचिन तेंडुलकर?’ असा प्रश्न विचारणारी मारिया शारापोव्हा सोशल मीडियावर टीकेचा आणि चर्चेचा विषय बनली होती. मारियाच्या या वक्तव्याचा सचिनच्या चाहत्यांनी जोरदार समाचार घेतल्याचं चित्र सोशल मीडियावर दिसलं.

विम्बल्डन फायनल मॅच दरम्यान इंग्लंडचा माजी कॅप्टन अँन्ड्र्यू स्ट्रॉससोबत सचिन रॉयल बॉक्समध्येही उपस्थित होता. मात्र, यावेळी मारियाला सचिन कोण आहे? याचा थांगपत्ताही नव्हता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.