कोपा फायनल : अर्जेन्टीना विरुद्ध चिली

कोपा अमेरिका फायनल - अर्जेन्टीना विरुद्ध चिली 

Updated: Jun 26, 2016, 10:55 PM IST
कोपा फायनल : अर्जेन्टीना विरुद्ध चिली

न्यूजर्सी : कोपा अमेरिका फायनलमध्ये अर्जेन्टीना विरुद्ध चिली असा हाय व्होल्टेज मुकाबला रंगणार आहे. लिओनेल मेसीच्या अर्जेन्टाईन टीमला 23 वर्षींनी कोपा अमेरिका कप जिंकण्याची संधी आहे. तर चिलीसमोर आपलं टायटल डिफेंड करण्याचं आव्हान असणार आहे. चिलीकडून अर्जेन्टीनाला याआधीच्या फायनलमध्ये पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. याची सव्याज परतफेड करण्याच्या उद्देशानचं मेसीची टीम फुटबॉलच्या मैदानावर इतरेल. 

अर्जेन्टीनानं 1993 मध्ये कोपा अमेरिका कप जिंकला होता. त्यानंतर त्यांना एकाही मेजर टुर्नामेंटचं अजिंक्यपद पटकावता आलं नव्हतं. आता चिलीविरुद्धचा पराभवाचा इतिहास बदलत लिओनेल मेसी आपल्या टीमला विजयश्री मिळवून देतो का याकडेच अर्जेन्टीनाच्या फुटबॉल फॅन्सचं लक्ष असेल. 

कोपा फायनल : अर्जेन्टीना विरुद्ध चिली

भारतीय वेळेनुसार : २७ जून सकाळी ५:३० मिनिटांनी 

चॅनेल : सोनी इएसपीएन

लाईव्ह मॅच : क्लिक करा - Live Final