कॉमनवेल्थ : भारताला आणखी तीन गोल्ड मेलड, एकूण 47 मेडल

कॉमनवेल्थमध्ये भारताच्या कुस्तीगीरांनी सलग तिसऱ्या दिवशी पदकांच्या मालिकेतील स्थान कायम राखले. योगेश्वर दत्त - गोल्ड (कुस्ती), बबिता कुमारी - गोल्ड (कुस्ती), विकास गौडा - गोल्ड (थाळी) यांनी सुवर्ण कामगिरी केली.भारताने आतापर्यंत 13 गोल्ड,  20 सिल्वर, 14 ब्राँझ मेडलसह एकूण 47 मेडल मिळविली आहेत. पदतालिकेत भारताचे पाचवे स्थान आहे.

Updated: Aug 1, 2014, 09:02 AM IST
कॉमनवेल्थ : भारताला आणखी तीन गोल्ड मेलड, एकूण 47 मेडल  title=

ग्लासगो : कॉमनवेल्थमध्ये भारताच्या कुस्तीगीरांनी सलग तिसऱ्या दिवशी पदकांच्या मालिकेतील स्थान कायम राखले. योगेश्वर दत्त - गोल्ड (कुस्ती), बबिता कुमारी - गोल्ड (कुस्ती), विकास गौडा - गोल्ड (थाळी) यांनी सुवर्ण कामगिरी केली.भारताने आतापर्यंत 13 गोल्ड,  20 सिल्वर, 14 ब्राँझ मेडलसह एकूण 47 मेडल मिळविली आहेत. पदतालिकेत भारताचे पाचवे स्थान आहे.

ऑलिंपिक ब्रॉंझपदकविजेत्या योगेश्‍वर दत्तसह महिलांमध्ये बबिताकुमारी आणि गीतिका जाखर यांनी गुरुवारी आपापल्या वजनी गटातून अंतिम फेरीत स्थान मिळविले. मात्र पवनकुमारला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. 

कुस्तीच्या अखेरच्या दिवशी ऑलिम्पिक पदकविजेत्या योगेश्वर दत्तने ६५ किलो वजनी गटामध्ये फ्री-स्टाइल प्रकारात गोल्ड मेडलची गवसणी घातली, तर महिलांमध्ये बबिता कुमारीने ५५ किलो वजनी गटामध्ये फ्री-स्टाइल प्रकारात गोल्ड मेडल पटकावले. महिलांच्या ६३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत गीतिका झाकरला पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

गीतिका झाकरला महिलांच्या ६३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कॅनडाच्या डॅनिले लॅपॅकेकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे तिचे सुवर्णपदकाचे स्वप्न हुकले. पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटात पवन कुमारने पाकिस्तानच्या मोहम्मद इनानला हरवून कांस्यपदक पटकावले.

भारत हॉकीच्या सेमी फायनलमध्ये
अखेरच्या साखळी लढतीमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला ५-२ अशा फरकाने हरवून राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेची सेमी फायनल गाठली आहे. दोन गोल झळकावणारा रुपिंदर पाल सिंग भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. भारताने पहिल्याच सत्रात ४-० अशी आघाडी घेतली होती. परंतु उत्तरार्धात दक्षिण आफ्रिकेने दोन गोल करून सामन्यात परण्याचा प्रयत्न केला. भारतानेही आणखी एक गोल झळकावला.

जिम्नॅस्टिक
युवा जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकरने ऐतिहासिक ब्राँझ मेडल पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावणारी दीपा ही पहिली महिला भारतीय जिम्नॅस्टिकपटू ठरली आहे. २० वर्षीय दीपाने कलात्मक जिम्नॅस्टिक स्पर्धेत १४.३६६ गुण कमावत ब्राँझ मेडल पटकावले.

बॅडमिंटन
भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप, आरएमव्ही गुरुसाईदत्त, आणि पी. सी. तुलसी यांनी चांगली कामगिरी करत स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.