मुजरा पार्टीत सामील होण या खेळाडूला पडलं महागात...

पाकिस्तान क्रिकेट टीमचा मधल्या फळीतील क्रिकेटर उमर अकमल याला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आलंय. एका मुजरा पार्टीत सहभागी झाल्यानं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलीय.

Updated: Nov 12, 2015, 08:37 PM IST
मुजरा पार्टीत सामील होण या खेळाडूला पडलं महागात...  title=

कराची : पाकिस्तान क्रिकेट टीमचा मधल्या फळीतील क्रिकेटर उमर अकमल याला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आलंय. एका मुजरा पार्टीत सहभागी झाल्यानं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलीय.

अकमल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नियमांना डावलून हैदराबादमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत एका डान्स पार्टीत सहभागी झाला होता... त्याच्या या कृत्यामुळे पीसीबी त्याच्यावर नाराज आहे.


उमर अकमल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुजरा पार्टी अकमलला चांगलीच भोवलीय. यासाठीच, पीसीबीनं त्याला इंग्लंडविरुद्ध तीन मॅचच्या टी२० सीरिजमध्ये त्याला टीमबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 

टीमची निवड करताना उमर अकमलचं नाव या स्पर्धेत सामील होतं पण बोर्डानं कारणे दाखवा नोटीस जारी केल्यानं त्याच्या नावाचा विचार मागे पडला. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी संपेपर्यंत अकमलची टीममध्ये निवड होणार नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.