विंडीज कर्णधार डॅरेन सॅमीचे असेही रुप

काही दिवसांपूर्वीच भारतात वर्ल्डकप स्पर्धा पार पडली. वेस्ट इंडिजने या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवत दुसऱ्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरले. 

Updated: Apr 25, 2016, 02:47 PM IST
विंडीज कर्णधार डॅरेन सॅमीचे असेही रुप title=

मुंबई : काही दिवसांपूर्वीच भारतात वर्ल्डकप स्पर्धा पार पडली. वेस्ट इंडिजने या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवत दुसऱ्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरले. 

वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने जेतेपदावर दुसऱ्यांदा शिक्कामोर्तब केले. या विजयात कार्लोस ब्राथवेट, मार्लोन सॅम्युअल्स यांनी विजयात मोलाचे योगदान दिले असले तरी डॅरेन सॅमीलाही विजयाचे तितकेच श्रेय जाते. 

सामन्यादरम्यान डॅरेन सॅमी जितका आक्रमक असतो त्याच्याविरुद्ध मैदानाबाहेर तो खेळीमेळीचे वातावरणात असतो. त्याचे असेच काहीसे रुप टी-२० वर्ल्डकपमधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाहायला मिळाले.