केकेआरविरुद्ध वॉर्नरचं वादळी शतक

केकेआरविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं वादळी शतक झळकावलं आहे.

Updated: Apr 30, 2017, 09:46 PM IST
केकेआरविरुद्ध वॉर्नरचं वादळी शतक  title=
सौजन्य : आयपीएल

हैदराबाद : केकेआरविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं वादळी शतक झळकावलं आहे. वॉर्नरनं ५९ बॉल्समध्ये १२६ रन्सची खेळी केली. यामध्ये १० फोर आणि ८ सिक्सचा समावेश होता.

डेव्हिड वॉर्नरच्या या खेळीमुळे हैदराबादनं २० ओव्हर्समध्ये २०९ रन्स केल्या. आयपीएलच्या या मोसमातलं हे तिसरं शतक आहे. याआधी दिल्लीच्या संजू सॅमसननं आणि पंजाबच्या हशीम अमलानं शतक झळकावलं होतं.