दिल्लीची नामुष्की, पंजाबविरुद्ध ६७ रन्सवर ऑल आऊट

यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीबरोबरच दिल्लीचीही हाराकिरी सुरूच आहे.

Updated: Apr 30, 2017, 09:19 PM IST
दिल्लीची नामुष्की, पंजाबविरुद्ध ६७ रन्सवर ऑल आऊट title=

मोहाली : यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीबरोबरच दिल्लीचीही हाराकिरी सुरूच आहे. पंजाबविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये दिल्लीचा ६७ रन्सवर ऑल आऊट झाला आहे. दिल्लीचं हे माफक आव्हान पंजाबनं एकही विकेट न गमावता ७.५ ओव्हर्समध्येच पार केलं. मार्टिन गप्टीलनं २७ बॉल्समध्ये नाबाद ५० तर हशीम आमलानं २० बॉल्समध्ये १६ रन्स केल्या.

मोहालीमध्ये खेळवल्या गेलेल्या या मॅचमध्ये पंजाबनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. मागच्या मॅचमध्ये दिल्लीचा कॅप्टन झहीर कान दुखापतग्रस्त झाल्यामुळे या मॅचमध्ये करुण नायरनं दिल्लीचं नेतृत्व केलं, पण दिल्लीचा दारूण पराभव झाला. पंजाबकडून संदीप शर्मानं ४ ओव्हर्समध्ये २० रन्स देऊन ४ विकेट घेतल्या.

या पराभवामुळे दिल्लीचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं स्वप्न जवळपास भंगल्यात जमा आहे. प्ले ऑफमध्ये खेळण्यासाठी आता दिल्लीला त्यांच्या उरलेल्या सहाही मॅच जिंकणं आवश्यक आहे. ८ मॅचमध्ये २ विजयासह ४ पॉईंट्स मिळवणारी दिल्ली पॉईंट्स टेबलवर शेवटच्या क्रमांकावर आहे.