मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल होत आहे. क्रिकेट रसिक भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत, तर या मॅचसाठी सट्टाबाजरही तेजीत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनंही या मॅचआधी भविष्यवाणी केली आहे.
या मॅचमध्ये भारत वेस्टइंडिजला हरवेल, अशी भविष्यवाणी दाऊदनं केली आहे, तसंच या मॅचमध्ये गेल चालेल असं दाऊदला वाटत असल्याच्या चर्चा सट्टाबाजारात आहेत.
भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या मॅचसाठी जवळपास अडीच हजार कोटींचा सट्टा लागला होता. पण या मॅचसाठी तब्बल चार हजार कोटींचा सट्टा लागला आहे.
सट्टाबाजारामध्ये सध्या विराट कोहली दुसऱ्या तर क्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे विराट कोहलीपेक्षा सट्टाबाजारामध्ये फ्लॉप ठरलेल्या रोहित शर्मावर मोठ्या प्रमाणावर सट्टा लागत आहे.